राष्ट्रीय

4G सेवांचे दर वाढण्याची शक्यता;विविध कंपन्या २०२२ मध्ये ३० टक्के दर वाढविणार

वृत्तसंस्था

देशात 5G दूरसंचार सेवा काही महिन्यात सुरू होण्याची चर्चा आहे. मात्र, ५जी सेवा सुरु होण्यापूर्वीच 4G ची सेवांचे दर वाढण्याची शक्यता आहे. विविध कंपन्या२०२२मध्ये ३० टक्के दर वाढविणार आहेत. त्यानंतर 5G साठी प्रीमियम दर आकारले जातील, असे क्रिसील रेटिंग्स, नोमुरा आणि गोल्डमॅन साक्स या एजन्सीने म्हटले आहे.

सात दिवस चाललेल्या 5G स्पेक्ट्रम लिलाव सोमवारी संपला. लिलावात १.५ लाख कोटी रुपयांच्या बोली लावण्यात आल्या. 5G स्पेक्ट्रममधील प्रचंड गुंतवणूक पाहता क्रिसील रेटिंग्सच्या अंदाजानुसार कंपन्या 5G सेवांसाठी वेगवेगळे दर आकारले जातील.

क्रिसिलच्या मते, 5G सेवांचा वापर 4G टॅरिफपेक्षा जास्त आणि त्याहून अधिक प्रीमियमवर अवलंबून असणार आहे. म्हणूनच लोक मोठ्या प्रमाणावर 5G स्वीकारतील याची खात्री करण्यासाठी कंपन्या 4G सेवांसाठी दर वाढवू शकतात. नोमुरा ग्लोबल मार्केट रिसर्चच्या अंदाजानुसार, कंपन्या दररोज १.५ जीबीच्या 4G प्लॅनवर ३० टक्क्यांपर्यंत प्रीमियम आकारू शकतात.

दूरसंचार कंपन्या 5G वर प्रीमियम दर आकारतील

नोमुराने एका अहवालात म्हटले आहे की, सुरुवातीला प्रीमियम ग्राहक (ज्यांच्याकडे १५ हजार रूपयांपेक्षा जास्त किमतीचे स्मार्टफोन आहेत) 5G सेवा घेण्यास सुरुवात करतील. असे होत गेले तर आमचा अंदाज आहे की, टेलिकॉम कंपन्या 5G वर प्रीमियम दर आकारतील. दुसरीकडे गोल्डमन सॅक्सने एका नोटमध्ये म्हटले आहे की, २०२२च्या अखेरीस टेलिकॉम कंपन्या एकदाच फोर जी च्या दरात वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील कमाईच्या वाढीची ही पुढची पायरी ठरणार आहे.

5G सेवा ऑक्टोंबर नोव्हेंबर किंवा वर्षाच्या अखेरीस कॉर्पोरेट्स आणि व्यावसायिकांसारख्या निवडक वापरकर्त्यांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. या सेवा सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन - तीन वर्षे लागू शकतात.

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

वांद्रे ते मरीन ड्राईव्ह फक्त १२ मिनिटांत! २.५ हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर लाँच

काय सांगता! फक्त ६ लाखांत घरी आणा 'या' जबरदस्त कार, फीचर्सही आहेत दमदार

होर्डिंगचा पाया मजबूत होता का? व्हीजेटीआय करणार ऑडिट; स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचा पालिकेचा आदेश

नवी मुंबई: 'रेप' केसला नाट्यमय वळण; आईसह बॉयफ्रेंडवर FIR; ६ वर्षांच्या मुलालाच 'तो' व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगितला