राष्ट्रीय

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर; देशभरातील 'या' ९ बड्या नेत्यांचे पंतप्रधानांना पत्र

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची तक्रार करणारे एक पत्र देशातील ९ बड्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले

प्रतिनिधी

देशभरातील विरोधी पक्षातील ९ मोठ्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले. यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. सीबीआय तसेच ईडी या तपास यंत्रणांचा विरोधकांविरोधात वापर होत असल्याचे सांगत भाजपवर टीका करण्यात आली आहे. यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांची नवे आहेत. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचादेखील समावेश आहे.

'विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लावला जात आहे. मात्र, हेच नेते जेव्हा भाजप पक्षात प्रवेश करतात, तेव्हा त्यांच्याविरोधात सुरू असलेली चौकशी थांबवली जाऊन त्यांना क्लीनचिटही दिली जाते,' असे या पत्रामध्ये लिहिलेले आहे. तसेच यामध्ये, राज्यपालांच्या भूमिकांवरही प्रश्चचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. 'जनतेने निवडून दिलेल्या सरकारच्या कामामध्ये राज्यपालांचा हस्तक्षेप होत असून केंद्र आणि राज्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. यामुळे केंद्रीय यंत्रणांची प्रतिमा मलिन होत आहे,' असेदेखील या पत्रामध्ये म्हंटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या या पत्रावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक