राष्ट्रीय

IANS वृत्तसंस्थेवर अदानी समूहाचा ताबा

उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने वृत्तसंस्था 'आयएएनएस' मधील उर्वरित २४ टक्के हिस्सा खरेदी करून या वृत्तसंस्थेवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. या व्यवहाराची आर्थिक रक्कम मात्र जाहीर करण्यात आलेली नाही.

Swapnil S

नवी दिल्ली : उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने वृत्तसंस्था 'आयएएनएस' मधील उर्वरित २४ टक्के हिस्सा खरेदी करून या वृत्तसंस्थेवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. या व्यवहाराची आर्थिक रक्कम मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. 'एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेड'ने 'आयएएनएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड'मधील उर्वरित हिस्सा खरेदी करण्यासाठी शेअर खरेदी करार केला असल्याची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या निवेदनात दिली आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये अदानी समूहाने 'आयएएनएस' मधील (इंडो-एशियन न्यूज सर्व्हिस) ५०.५० टक्के बहुसंख्य हिस्सा विकत घेतला होता. त्यामुळे 'आयएएनएस' ही अदानी समूहाच्या मीडिया शाखेची उपकंपनी बनली होती. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये 'एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेड' ने 'आयएएनएस' मधील मतदानाधिकार असलेल्या शेअर्समधील आपला हिस्सा वाढवून ७६ टक्के केला, तसेच जवळपास सर्वच मतदानाधिकार नसलेले शेअर्स आपल्या ताब्यात घेतले होते.

कराडजवळ ६ हजार कोटींचे 'ड्रग्ज' जप्त; DRI ची कारवाई

पुनर्जतन केलेल्या 'टर्न टेबल शिडी' वाहनाचे आज अनावरण; गोदीतील आगीत बजावली होती महत्त्वाची भूमिका

पद्म पुरस्कारांची घोषणा : दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांच्यासह ५ जणांना पद्मविभूषण, १३ जणांना पद्मभूषण आणि ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार

Mumbai : लोकलमध्ये किरकोळ वाद, प्राध्यापकाची हत्या; आरोपी ओमकार शिंदेला २४ तासात अटक, थरार CCTV मध्ये कैद

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनानिमित्त द्या मराठी शुभेच्छा; WhatsApp Status वर शेअर करा 'ही' खास ग्रीटिंग्स