गेल्या आठवड्यात आघाडीच्या दहा पैकी आठ कंपन्यांच्या बाजारमूल्यात १,९१,६२२.९५ कोटींची भर पडली आहे. बजाज फायनान्स आणि टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेसला सर्वाधिक लाभ झाला आहे. गेल्या आठवड्यात दि ३० -शेअर बीएसई सेन्सेक्स १,४९८.०२ अंक किंवा २.६७ टक्के वधारला.
शुक्रवारच्या व्यवहारात बजाज फायनान्सचे बाजारमूल्य ५७,६७३.१९ कोटींनी वधारुन ४,३६,४४७.८८ कोटी रु. टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस (टीसीएस)चे मूल्य ४७,४९४.४९ कोटींनी वाढून १२,०७,७७९.६८ कोटी रु. एचडीएफसी बँकेचे २३,४८१.०९ कोटींनी भर पडून ७,९७,२५१.१८ कोटी झाले. तसेच इन्फोसिसचे १८,२१९ कोटींनी वाढून ६,५२,०१२.९१ कोटी, एचडीएफसीचे १४,९७८.४२ कोटींनी वधारुन ४,३१,६७९.६५ कोटी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे १२,९४०.६९ कोटींनी भर पडून ४,७१,३९७.९९ कोटी, आयसीआयसीआय बँकेचे १२,८७३.६२ कोटी ५,६९,४००.४३ कोटी तर रिलायन्स इंडस्ट्रीज लि.चे ३,९६२.४५ कोटींनी वाढून १६,९७,२०८ कोटी रु. झाले. तथापि, एलआयसीचे मूल्य ७,०२०.७५ कोटींनी घसरुन ४,२८,७३९.९७ कोटी रु. झाले. हिंदुस्तान युनिलिव्हर लि.चे मूल्य ८१०.६१ कोटींनी घटून ६,१९,५५१.९७ कोटी रु. झाले. आघाडीच्या दहा कंपन्यांच्या क्रमवारीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अव्वल स्थान कायम राखले. तर त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स, एचडीएफसी आणि एलआयसी यांचा क्रम लागतो.