राष्ट्रीय

दुर्घटनाग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील डेटा मिळाला! केंद्रीय मंत्रालयाने दिली माहिती

एअर इंडियाच्या अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या दुर्घटनाग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील डेटा मिळाला असून त्यामधील माहिती यशस्वीपणे डाऊनलोड करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. दुर्घटनेत या ब्लॅक बॉक्सचे काही प्रमाणात नुकसान झाल्यामुळे त्यातील माहितीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

Swapnil S

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या दुर्घटनाग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील डेटा मिळाला असून त्यामधील माहिती यशस्वीपणे डाऊनलोड करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. दुर्घटनेत या ब्लॅक बॉक्सचे काही प्रमाणात नुकसान झाल्यामुळे त्यातील माहितीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. तपासाचा भाग म्हणून कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डरचे विश्लेषण सुरू करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दोन आठवड्यांपूर्वी १२ जून रोजी एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानाच्या अवशेषांमधून दुसऱ्या दिवशी ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला होता. एअर इंडियाचे एआय १७१ हे विमान नेमके कशामुळे दुर्घटनाग्रस्त झाले, शेवटच्या क्षणी नेमके कॉकपिटमध्ये काय घडले, वैमानिकाने अपघात टाळण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले, दोन्ही वैमानिकांमध्ये काय संवाद झाला, आदी सर्व प्रश्नांची उत्तरे या ब्लॅक बॉक्समधून शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

एअर इंडिया विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून डेटा डाऊनलोड करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सरकारने गुरुवारी स्पष्ट केले आहे, असे वृत्त वृत्तसंस्थेने दिले आहे. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) प्रमुखांच्या नेतृत्वाखालील एक बहु-विद्याशाखीय पथक या विमान अपघाताची चौकशी करत आहे. तपासाचा एक भाग म्हणून कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डरचे विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. पुढील ब्लॅक बॉक्समधून क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले आहे.

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता

मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लॉटरी! मिळणार ५०० चौरस फुटांचे घर; शासकीय भूखंडावरील अतिक्रमणधारकांना राज्य सरकारचा दिलासा

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा