राष्ट्रीय

अमित शहा यांचा राहुल गांधी यांना टोला

वृत्तसंस्था

काँग्रेस नेते विचारतात की, आठ वर्षांत काय झालं? हे लोक डोळे मिटून बसले नाहीत. राहुल गांधींनी आपला इटालियन चश्मा काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सीएम पेमा खांडू यांनी केलेली विकासकामं पाहावीत,” असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लगावला. शहा सध्या अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांनी नामसाई जिल्ह्याला भेट दिली. त्यांनी एक हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार अरुणाचलच्या पाठीशी नेहमीच उभं राहील,” असं शाह म्हणाले. गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी तिराप जिल्ह्यातील नरोत्तम नगरमधील रामकृष्ण मिशन स्कूलच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी ते म्हणाले, अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील आंतरराज्य सीमा विवाद यावर्षी मिटण्याची शक्यता आहे. संपूर्ण ईशान्येकडील भाग दहशतवादमुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून आठ वर्षांत ईशान्येत नऊ हजार दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आसाम आणि मेघालय यांच्यातील सुमारे ६० टक्के आंतरराज्य सीमा विवाद सामंजस्याने सोडवण्यात आले आहेत. अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील वादही २०२३ पूर्वी मिटतील, अशी आशा शहा यांनी व्यक्त केली. यावेळी कायदामंत्री किरेन रिजिजूही उपस्थित होते.

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह पोस्टसाठी आचारसंहिता तयार करा! सुप्रीम कोर्टाचे केंद्र, राज्यांना निर्देश

शिवसेना नाव, चिन्हाबाबतची सुनावणी ऑगस्टमध्ये; सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

मार्केटिंगच्या बहाण्याने चोरीस जाईल वैयक्तिक डेटा; ‘स्पॅम विशिंग कॉल’ची डोकेदुखी थांबवा