राष्ट्रीय

चीनमध्ये आढळला आणखी एक जीवघेणा संसर्गजन्य विषाणू

वृत्तसंस्था

‘कोरोना’, ‘मंकीपॉक्स’नंतर आता देशात आणखी एका संसर्गजन्य आजाराने जन्म घेतला आहे. ‘झुनोटिक लंग्या’ नावाचा हा व्हायरस असून, विशेष म्हणजे, कोरोनाप्रमाणे चीनमध्येच हा व्हायरस सापडला आहे. आतापर्यंत ३५ लोकांना या व्हायरसने संक्रमित केले आहे. प्राण्यांमधून या विषाणूचा प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. या आजाराविषयी अधिक तपशीलवार माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे तायवानच्या रोग नियंत्रण केंद्राकडून सांगण्यात आले.  चीनच्या शेंडोंग आणि हेनान प्रांतात ‘लंग्या’ व्हायरसचा तीव्र संसर्ग असलेल्या ३५ रुग्णांची ओळख पटली असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यापैकी २६ जणांना ‘लंग्या’ विषाणूची लागण झाली आहे. विषाणूची लागण झालेल्या २६ रुग्णांमध्ये ताप, थकवा, खोकला, भूक न लागणे, स्नाय दुखणे, मळमळ, डोकेदुखी आणि उलट्या ही लक्षणे आढळून आली आहेत. त्यांच्यामध्ये पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाणही कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यासोबतच प्लेटलेट्स कमी होणे, यकृत निकामी होणे, किडनी निकामी होणे, या गोष्टीही समोर आल्या. या आजाराची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी केली असता अद्याप तरी त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे हा विषाणू माणसाकडून माणसात पसरण्याची शक्यता कमी असल्याचे अनुमान काढले जात आहे. पाळीव प्राण्यांच्या केलेल्या सर्वेक्षणात दोन टक्के शेळ्या आणि पाच टक्के कुत्र्यांना या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे प्राण्यांपासून सावधान राहण्याची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले.

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

ऑस्ट्रेलियाची दोन भारतीय हेरांवर कारवाई

'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे रिंकूने स्थान गमावले; बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचा संघ निवडीबाबत गौप्यस्फोट

Video: देशातील पहिली Vande Bharat Metro तयार, 'या' मार्गांवर सुरु होणार सेवा

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम