राष्ट्रीय

मोदींची माफी मागा! मालदीवच्या नेत्याचा अध्यक्षांना सल्ला

मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागावी, असा सल्ला तेथील जम्हुरी पार्टी (जेपी) या राजकीय पक्षाचे नेते गौसीम इब्राहीम यांनी त्यांना दिला आहे.

Swapnil S

माले : मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागावी, असा सल्ला तेथील जम्हुरी पार्टी (जेपी) या राजकीय पक्षाचे नेते गौसीम इब्राहीम यांनी त्यांना दिला आहे.

मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझू यांनी काही दिवसांपूर्वी चीनचा पाच दिवसांचा दौरा केला होता. तेथून परतल्यानंतर मुईझू यांनी भारताचे नाव न घेता असे म्हटले होते की, 'आमचा देश लहान असेल. पण म्हणून कोणीही आमच्यावर दबाव टाकू शकत नाही.’ मुईझू यांनी मोदी यांची माफी मागून भारताबरोबर बिघडलेले संबंध पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे गौसीम इब्राहीम यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी मोदी यांच्या लक्षद्वीप भेटीवरून टीका केल्याबद्दल मालदीवच्या तीन मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावरून भारताच्या अनेक पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार टाकला होता. या प्रकरणी भारतासारख्या विश्वासू शेजारी देशाला नाराज केल्याबद्दल मालदीवच्या विरोधी पक्षांनी मुईझू यांच्यावर बरीच टीका केली. मुईझू यांच्या सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी करून संसदेत त्यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणला.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत