राष्ट्रीय

‘नीट’ परीक्षा प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तज्ज्ञ समिती नेमा! सुप्रीम कोर्टाचा आदेश

‘नीट-यूजी २०२४’ परीक्षेत विचारण्यात आलेला भौतिकशास्त्रातील विशिष्ट प्रश्न आणि त्यावरील अचूक उत्तराचा अहवाल मंगळवारी दुपारपर्यंत सादर करण्यासाठी तीन तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी आयआयटी - दिल्लीच्या संचालकांना दिले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : ‘नीट-यूजी २०२४’ परीक्षेत विचारण्यात आलेला भौतिकशास्त्रातील विशिष्ट प्रश्न आणि त्यावरील अचूक उत्तराचा अहवाल मंगळवारी दुपारपर्यंत सादर करण्यासाठी तीन तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी आयआयटी - दिल्लीच्या संचालकांना दिले आहेत.

भौतिकशास्त्रातील विशिष्ट प्रश्नाची दोन अचूक उत्तरे होती, ज्या परीक्षार्थीने दोन अचूक उत्तरांपैकी एक उत्तर अचूक दिले आहे, त्याला चार गुण देण्यात आले आहेत, असा दावा काही उमेदवारांनी केला त्याची सुप्रीम कोर्टाने दखल घेतली.

याचा यशस्वी उमेदवारांच्या अंतिम गुणवत्ता यादीवर लक्षणीय परिणाम होणार आहे, असे याचिकाकर्त्यांनी न्यायालयात सांगितले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी