राष्ट्रीय

स्पाइसजेट स्पाइस एक्सप्रेसच्या विलगीकरणास मान्यता

वृत्तसंस्था

विमान कंपनी स्पाइसजेट ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात स्पाइस एक्सप्रेसपासून वेगळी होऊ शकते. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनी रविवारी ही माहिती दिली. "बँका आणि भागधारकांनी स्पाइसजेट एअरलाइनमधून कार्गो आणि लॉजिस्टिक्स कंपनी स्पाइस एक्सप्रेसच्या विलगीकरणास मान्यता दिली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विभागणी पूर्ण होईल, असे ते म्हणाले.

खरेतर, स्पाइसजेटने गेल्या वर्षी १७ ऑगस्ट रोजी सांगितले होते की, ते विक्रीच्या आधारावर आपली कार्गो आणि लॉजिस्टिक सेवा उपकंपनी स्पाइस एक्सप्रेस वेगळे करेल. कंपनीने सांगितले की यामुळे स्वतंत्रपणे निधी उभारण्यात मदत होईल आणि वेगवान वाढ होईल.

स्पाइसजेटची चौकशी सुरू आहे

स्पाइसजेट सध्या नियामक तपासणीत आहे. पाच दिवसांपूर्वी, विमान कंपनीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे कारण १९ जूनपासून त्यांच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या किमान आठ घटना घडल्या होत्या. डीजीसीएने सांगितले की, विमान कंपनी सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह हवाई सेवा देण्यात अपयशी ठरली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी स्पाइसजेटला तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

विमान कंपनी चार वर्षांपासून तोट्यात

गेल्या चार वर्षांपासून विमान कंपनी तोट्यात आहे.२०१८-१९, २०१९-२० आणि २०२०२१ मध्ये अनुक्रमे ३१६ कोटी रुपये, ९३४ कोटी रुपये आणि९९८ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यानंतर, एप्रिल-डिसेंबर २०२१ मध्ये १,२४८ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला. दुसरीकडे, स्पाइस एक्सप्रेसचा महसूल वाढत आहे. स्पाइस एक्सप्रेसने ऑक्टोबर-डिसेंबर२०२१ या तिमाहीत १७ टक्क्यांनी वाढ करून ५८४ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.

सिंग यांनी गेल्या आठवड्यात पीटीआयला सांगितले होते की, “आम्हाला स्पाईसजेटमधून स्पाईसजेटच्या विलगीकरणासाठी भागधारकांची मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी आम्हाला आमच्या बँकांकडून मंजुरीही मिळाली आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्ही प्रक्रिया पूर्ण करू.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम