संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

आसाराम बापू उपचारासाठी खोपोलीत; पोलिसांचा कडक बंदोबस्त

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जोधपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला स्वयंभू धर्मगुरू आसाराम बापू याला रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील माधवबाग वैद्यकीय केंद्रात आणण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जोधपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला स्वयंभू धर्मगुरू आसाराम बापू याला रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील माधवबाग वैद्यकीय केंद्रात आणण्यात आले आहे. हृदयाशी संबंधित आजारावर उपचारासाठी आसाराम बापू याला आणण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

८३ वर्षीय आसाराम याला सप्टेंबर २०१३ मध्ये अटक करण्यात आली होती. आसाराम याला खोपोली येथील आयुर्वेदिक रुग्णालयाच्या हृदयरोग निवारण केंद्रात मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास पोलीस संरक्षणात आणण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आसारामवर पुढील सात दिवस हृदयाशी संबंधित काही आजारांवर उपचार केले जातील, असेही सांगण्यात आले. राजस्थान उच्च न्यायालयाने आसारामला १३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार, आसारामला येथे आणण्यात आले. येथे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

आजपासून GST बचत उत्सव! पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा : स्वदेशी, स्वावलंबनावर भर; जनतेची २.५ लाख कोटींपेक्षा जास्त बचत होणार

आरक्षणाच्या राजकारणात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

नरेंद्र मोदी : उच्चभ्रू राजकीय वर्गाला आव्हान देणारे लोकनायक

आजचे राशिभविष्य, २२ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?