राष्ट्रीय

दिल्लीत सर्वात मोठी चोरी करणारे सापडले १८ किलो सोने मिळाले

हिरेजडित दागिने व साडेबारा लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील उच्चभ्रू भागातील सुवर्णकाराचे दुकान फोडून सुमारे २५ कोटींचा दरोडा टाकणाऱ्यांपैकी दोन चोरांना दिल्ली पोलिसांनी छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातून अटक केली आहे. त्यांच्याकडून १८.५ किलो सोने आणि हिऱ्याचे काही दागिने देखील परत मिळवले आहेत.

गुन्हेविरोधी आणि सायबर पथकांनी संयुक्त कारवार्इअंतर्गत या दोघांना अटक केली आहे. पोलिसांना एक टीप मिळाल्यानंतर बुधवारी चंद्रवंशी नावाच्या व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून २३ लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले. दरम्यान, श्रीवास नावाचा दुसरा चोर पसार होण्यात यशस्वी झाला, मात्र पोलीस त्याचा माग काढण्यात यशस्वी झाले. त्यांनी स्म्रिती नगरमधील घरातून त्याला उचलले. त्याच्याकडून १८.५ किलो सोने आणि हिरेजडित दागिने व साडेबारा लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली. दोन्ही चोरांची उलट तपासणी केली असता हा सर्व मुद्देमाल दिल्लीतील दरोड्यातील असल्याचे उघड झाले. दरम्यान, दिल्ली पोलिसांचे पथक देखील छत्तीसगडमध्ये दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. किमान तीन लोक या दरोड्यात सामील असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश