राष्ट्रीय

प्रजासत्ताक दिनानिमित्त बीकेटी टायर्सची ‘मुस्कुरायेगा इंडिया’ या गीताने भारताच्या शेतकरी, जवानांना मानवंदना

प्रतिनिधी

टायर क्षेत्रातील प्रसिद्ध असलेल्या बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बीकेटी) या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘मुस्कुरायेगा इंडिया’ हे प्रेरणादायी गीत प्रसिद्ध केले. देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे शेतकरी आणि आपल्या राष्ट्राचे मजबूत आधारस्तंभ असलेल्या भारतीय जवानांना समर्पित असे हे गीत आहे. जे 'जस्ट म्युझिक'ने शेतकरी आणि सैनिकांच्या अतुलनीय योगदानाला सलाम करणारे ‘मुस्कुरायेगा इंडिया’ हे गीत तयार केले आहे. आपल्या सीमांचे रक्षण करणाऱ्यांपासून ते आपल्या जमिनीची लागवड करणाऱ्यांपर्यंत, ज्यांनी आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशा प्रत्येकाला 'मुस्कुरायेगा इंडिया' या गीताद्वारे, बीकेटीने मानवंदना दिली आहे.

बीकेटीचे सहव्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार म्हणाले की, “या प्रजासत्ताक दिनी आम्हाला काहीतरी विशेष करायचे आहे आणि आमच्या देशाच्या खऱ्या नायकांचा - शेतकरी आणि सैनिकांचा सन्मान करण्याची इच्छा आहे. 'मुस्कुरायेगा इंडिया' ही आमच्या संपूर्ण कंपनीकडून आमच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या व्यक्तींना मानवंदना आहे. ते आपल्या राष्ट्रामध्ये एकता निर्माण करण्यात अविभाज्य भूमिका निभावतात आणि विविधतेला सर्वात अनोख्या पद्धतीने साजरे करतात,” ते पुढे म्हणाले की, “या वीरांचे कठोर परिश्रम, आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी देशवासियांना आमच्यासोबत सामील होण्यासाठी आमंत्रित करत आहे.”

मुस्कुरायेगा इंडिया हे गीत अनुपमा मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव खन्ना याच्यावर चित्रित करण्यात आलेले आहे. या गीतामध्ये वीरचक्र विजेते कर्नल ललित राय यांचा देखील सहभाग आहे. तसेच गीताच्या शेवटी प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग हा शेतकरी आणि भारतीय जवानांना कडक सॅल्यूट मारताना दिसतो. शेतकरी बांधव अविरत कष्ट करुन जमिन पिकवतात, त्यामुळे आपण सुखाचे दोन घास खाऊ शकतो. तर आपले जवान डोळ्य़ांत तेल टाकुन आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करतात, त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित आहोत. या दोघांमुळे आपले जीवन सुसह्य आहे. या दोघांच्या त्यागाला आणि कष्टाला मुस्कुरायेगा इंडिया या गीताद्वारे बीकेटी परिवार मानवंदना देत आहे. देशबांधवांनी देखील यात सामील व्हावे असे आवाहन बीकेटी परिवाराने केले आहे.

"...मी कोणाच्या बापाचेही ऐकत नाही", अजित पवार यांचा विरोधकांना इशारा

ठाकरेंसाठी मोदींची साखरपेरणी; बाळासाहेबांवर स्तुतिसुमने

कल्याणमध्ये ठाकरेंची नवी खेळी; माजी महापौर रमेश जाधवही मैदानात, दरेकर की जाधव, लढणार कोण?

प्रादेशिक असमतोलाचे भान राखणे गरजेचे!

भय संपलेले नाही...