राष्ट्रीय

Video: मोमोज विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला; गर्दी बघत होती, पण 2 तरुणींनी धाडस दाखवलं अन्...

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याआधारे पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Swapnil S

इंदूरमध्ये किरकोळ वादातून हल्ला करत तरुणांनी मोमोज विक्रेत्याला गंभीर जखमी केलं. ही संपूर्ण घटना रस्त्याच्याकडेला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याआधारे पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गुलशन सोनकर असं या मोमोज विक्रेत्याचं नाव आहे. येणारे-जाणारे लोक हा तमाशा बघून व्हिडिओ बनवत होते, मध्यस्थी करण्याची कुणाची हिंमत झाली नाही. मात्र दोन तरुण मुलींनी धाडस दाखवत गुलशनला वाचवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण भंवरकुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विष्णुपुरी येथे घडलं आहे.

नेमकं काय घडलं?

मुसाखेडी येथे राहणारा गुलशन नावाचा तरुण मोमोजची गाडी घेऊन उभा होता. तेवढ्यात दुचाकीवरून काही तरुण तिथून गेले आणि गुलशनला गाडी काढण्यास सांगू लागले. या किरकोळ बाचाबाचीचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं. दुचाकीस्वारांनी गुलशनला त्याची कॉलर पकडून बेदम मारहाण केली आणि चाकूने वार केले. गुलशनचा मित्र आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या एका महिलेवरही चाकूने वार केले गेले.

आरोपींवर गून्हा दाखल-

या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्यामध्ये हा संपूर्ण वाद स्पष्ट दिसत आहे, तरूण कसे जोरदार भांडत राहिले पण शेजारी उभे असलेले काही लोक विरोध करत नव्हते.

जेव्हा लोकं हा वाद पाहत होते आणि व्हिडिओ बनवत होते, तेव्हा दोन मुलींनी धाडस करत हा वाद थांबवला आणि गुलशनला वाचवलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आपटा हरवतोय…दसऱ्याचे सोने की नकली पाने? बाजारात कांचनच्या पानांचा सुळसुळाट

राज्यात आता २४ तास शॉपिंग उत्सव; मॉल्स, दुकानांसह सर्व आस्थापने उघडी ठेवण्यास सरकारची परवानगी

‘लाडक्या बहिणीं’साठी वडील, पतीचे ‘आधार’ सक्तीचे; राज्य सरकारचा निर्णय

ठाणे पालिकेचे उपायुक्त ACB च्या जाळ्यात; २५ लाखांच्या लाचप्रकरणी अटकेत

Mumbai : गरब्यात अंडी फेकल्याने गोंधळ; मीरारोडमधील घटना, काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल