राष्ट्रीय

सेंट्रल बँक ऑफ इंडियाची फेस्टिव्हल ऑफरमध्ये वाढ

Swapnil S

मुंबई : सरकारी मालकीच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाने आपल्या किरकोळ कर्जात वाढ करण्याच्या उद्देशाने आपल्या उत्सव ऑफरला ३१ मार्च २०२४ पर्यंत तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ही ऑफर ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत होती.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे सरव्यवस्थापक (किरकोळ मालमत्ता) विवेक कुमार यांनी सांगितले की, बँक या कालावधीत ग्राहकांसाठी कमी व्याजदर, प्रक्रिया शुल्कात माफी आणि इतर सुविधा देत आहे. सेंट गृह लक्ष्मी योजना आणि सेंट बिझनेस स्कीम ८.३५ टक्क्यांपासून सुरू होणाऱ्या उद्योगांमध्ये सर्वात कमी व्याजदर ऑफर करत आहेत.

गेल्या आठवड्यात, बँकेने दिल्ली-एनसीआरमधील प्रमुख रिअल इस्टेट विकासकांशी देखील बैठक घेतली. सुमारे १५० डायरेक्ट सेल्स एजंट आणि ५० प्रख्यात बांधकाम व्यावसायिक या कार्यक्रमात सामील झाले. बहुतेक उत्पादनांवरील व्याजदर वाढले असून आणखी वाढ करण्यास फारसा वाव नसल्याचेही ते म्हणाले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त