प्रातिनिधिक छायाचित्र  
राष्ट्रीय

'जलद डिलिव्हरी' आता होणार आरामात; झेप्टो, ब्लिंकिट, स्विगीबाबत केंद्र सरकारचा निर्णय

देशभरातील डिलिव्हरी बॉय आणि गिग वर्कर्सच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १० मिनिटांमध्ये डिलिव्हरी देण्यावर बंदी घातली आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाने यासंदर्भात देशातील प्रमुख ऑनलाइन डिलिव्हरी, क्विक कॉमर्स कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला.

Swapnil S

नवी दिल्ली : देशभरातील डिलिव्हरी बॉय आणि गिग वर्कर्सच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १० मिनिटांमध्ये डिलिव्हरी देण्यावर बंदी घातली आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाने यासंदर्भात देशातील प्रमुख ऑनलाइन डिलिव्हरी, क्विक कॉमर्स कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला.

केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी यासंदर्भात ब्लिंकिट, झेप्टो, स्विगी आणि झोमॅटोसारख्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि डिलिव्हरी वेळेची मर्यादा काढून टाकण्याचे निर्देश दिले. यानंतर सर्व कंपन्यांनी सरकारला आश्वासन दिले की, ते आपापल्या ब्रँड जाहिराती आणि सोशल मीडियावरुन डिलिव्हरी वेळेची मर्यादा काढून टाकतील. म्हणजेच आता यापुढे कोणतेही सामान दहा मिनिटांत मिळणार नाही.

ब्लिंकिटने केली अंमलबजावणी

सरकारी निर्देशांचा तत्काळ परिणाम ब्लिंकिटवर दिसून आला. कंपनीने आपल्या सर्व जाहिरात आणि प्लॅटफॉर्मवरुन १० मिनिटांत डिलिव्हरीचा उल्लेख हटवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपली टॅगलाइन बदलत “१० मिनिटांत १०,००० अधिक उत्पादने”ऐवजी, “तुमच्या दारात ३०,००० अधिक उत्पादने” अशी नवी जाहिरात केली आहे. येत्या काही दिवसांत इतर क्विक कॉमर्स कंपन्यांकडूनही अशाच प्रकारचे निर्णय घेतले जातील.

थायलंडमध्ये भीषण दुर्घटना! धावत्या ट्रेनवर अचानक क्रेन कोसळल्याने किमान २२ ठार, ३० जखमी; आकडा वाढण्याची भीती

'संपूर्ण पाकिस्तानव्याप्त काश्मीर भारताचाच'; लडाखच्या LG नी ठणकावले, शक्सगाम खोऱ्यावरील चीनचा दावा फेटाळला

अजित पवारांच्या 'डिझाईन बॉक्स'ची तपासणी! राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर छापा; प्रचार संपल्यानंतर गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे खळबळ

ग्लॅमरचा पडदा, राजकीय अजेंडा हा मुलाखतींचा नवा 'पॅटर्न'; सेलिब्रिटींच्या मुलाखतींमधून मतदारांना भावनिक साद की राजकीय दिशाभूल..?

मुंबईसह राज्यातील २६-२७ मनपा आम्ही जिंकू! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृढ विश्वास