PM
राष्ट्रीय

केरळमध्ये मुख्यमंत्री-राज्यपाल संघर्ष चालूच

राज्यपालांवर कठोर टीका करताना विजयन म्हणाले की जर खान यांचा राजकीय भूतकाळ लक्षात घेतला तर अनेकांनी ते संधीसाधू असल्याचे निदर्शनास आणले आहे

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : केरळमधील सत्ताधारी डावी आघाडी आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष आणि शब्दच्छल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बुधवारी राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांनी केरळचे मुख्यमंत्री आणि मंत्री याना लाज वाटत नाही, असे सांगत टीका केली तर त्यांच्यावर लगेच केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी खान यांना संधीसाधू म्हणत प्रत्युत्तर दिले.

विजयन म्हणाले की ‘राज्यपालांनी राज्यपाल म्हणून काम केले पाहिजे’ तसेच त्यांनी  आपण काहीही करू शकतो किंवा कोणाला आव्हान देऊ शकतो किंवा त्याला जे वाटेल ते बोलू शकतो असा विचार करू नये. त्यांच्या पदाला घटनेनुसार जे करण्याची परवानगी आहे तेच त्यांनी केले पाहिजे. त्यांच्या पदाचे महत्त्व कमी करू नये. आरिफ मोहम्मद खान यांनी एक व्यक्ती म्हणून हे समजून घेतले आणि त्यानुसार ते वागले तर बरे होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यपालांवर कठोर टीका करताना विजयन म्हणाले की जर खान यांचा राजकीय भूतकाळ लक्षात घेतला तर अनेकांनी ते संधीसाधू असल्याचे निदर्शनास आणले आहे. जे संधिसाधू आहेत ते काहीही करू शकतात, हा आपल्या देशाचा अनुभव आहे. पण, केरळमध्ये मला जे म्हणायचे आहे ते करण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा विजयन यांनी राज्यातील कोट्टायम जिल्ह्यातील नव केरळ सदासला येथील एका भाषणात बोलताना दिला.

त्यापूर्वी आदल्या दिवशी खान यांनी विजयन आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर शरसंधान करताना ‘त्यांना कोणतीही लाज वाटत नाही’  असा आरोप केला. राज्यातील काही विद्यापीठांच्या सिनेटमध्ये त्यांनी केलेल्या नामांकनावरून डाव्या सरकारच्या मंत्र्यांकडून त्यांच्यावर झालेल्या कथित टीकेचा संदर्भ ते देत होते."मी सिनेटवर कोणाला उमेदवारी देतो, याची त्यांना काळजी कशी? मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना लाज वाटत नाही. राज्याचे अर्थमंत्री आले आणि त्यांनी मला एका व्यक्तीला उमेदवारी देण्याची विनंती केली. मी नामनिर्देशित केलेले लोक कुलगुरूंनी सुचविलेल्या यादीपेक्षा वेगळे आहेत हे या लोकांना (मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना) कसे कळले? त्यांनी (मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी) नामनिर्देशित व्यक्तींची यादी माझ्याकडे शिफारस करण्यासाठी कुलगुरूंकडे शिफारस केली, असे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री