राष्ट्रीय

डेहराडूनमध्ये सिलिंडरमधून क्लोरीन वायू गळती

डेहराडूनच्या झाझरा भागात क्लोरीन वायूच्या गळतीमुळे घबराट पसरली होती.

Swapnil S

डेहराडून : डेहराडूनच्या झाझरा भागात क्लोरीन वायूच्या गळतीमुळे घबराट पसरली होती. त्यामुळे लोकांना घरे सोडण्यास भाग पाडले गेले. मोकळ्या जागेत ठेवलेल्या सिलिंडरमधून गॅस लीक झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा अधिकाऱ्यांनी ताबडतोब धाव घेत कारवाई केली. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) कमांडंट, आवश्यक उपकरणांसह रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि अणुतज्ज्ञांसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना आढळले की निवासी क्षेत्राजवळ असलेल्या प्लॉटमध्ये ठेवलेल्या चार सिलिंडर्सपैकी एकाची गळती होत होती.

Mumbai : धरणांतील पाणीसाठा घटला; BMC चे नवे नियम जाहीर, पाण्याचा गैरवापर केल्यास कारवाईचा इशारा

NEET UG 2026 Re-Exam : टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी; परीक्षेआधी NTA चा मोठा निर्णय

आता डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असेल तरच मिळेल कफ सिरप; औषध विक्रीच्या नियमात केंद्र सरकारचा मोठा बदल

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा लांबणीवर; आता २० जूनला होणार निर्णय

सौरव गांगुलींकडून फेसबुक पेजविरोधात तक्रार दाखल; खोटी माहिती पसरवल्याचा आरोप