राष्ट्रीय

जेएनयूत हाणामारी, साबरमती ढाब्यावर विद्यार्थ्यांचे दोन गट आले समोरा समोर

२०२४ च्या जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीसाठी कॅम्पसमधील साबरमती ढाब्यावर युनिव्हर्सिटी जनरल बॉडी मीटिंग दरम्यान विद्यार्थी गटांमध्ये ही हाणामारी झाली.

Swapnil S

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका घेण्याबाबत झालेल्या बैठकीत हाणामारी झाली. दोन्ही बाजूंनी त्यांचे काही सदस्य जखमी झाल्याचा दावा केला. भांडण करणाऱ्या गटांनी गोंधळासाठी दुसऱ्या बाजूस दोष दिला, परंतु जेएनयू प्रशासनाकडून त्वरित प्रतिक्रिया आली नाही. या संघर्षात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विचारसरणीच्या डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशन या दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष झाला. २०२४ च्या जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीसाठी कॅम्पसमधील साबरमती ढाब्यावर युनिव्हर्सिटी जनरल बॉडी मीटिंग दरम्यान विद्यार्थी गटांमध्ये ही हाणामारी झाली.

Mumbai : २० सप्टेंबरपासून मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद; MMRDA चा निर्णय

राज्यातील सर्व न्यायालये कार्यरत आहेत का? खासदार, आमदारांविरोधातील खटल्यांबाबत हायकोर्टाने सरकारला फटकारले

किंगफिशर कर्ज घोटाळा प्रकरण : विशेष न्यायालयाचा तपास यंत्रणेला झटका; आरोपीच्या जबाबासंबंधी CBI चा अर्ज धुडकावला

Thane : जड वाहनांना रात्री १२ नंतरच घोडबंदर रोडवर प्रवेश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश

पाकिस्तानकडून ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल; भारताने तिसऱ्या देशाची मध्यस्थी नाकारल्याचा पाक परराष्ट्र मंत्र्यांचा गौप्यस्फोट