@upuknews1/X
राष्ट्रीय

कानपूरजवळ साबरमती एक्स्प्रेसचे डबे घसरले; कोणीही जखमी नाही

Swapnil S

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर आणि भीमसेन स्थानकांदरम्यान साबरमती एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरून शनिवारी अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, कानपूरजवळील गोविंद पुरीसमोर मार्गावर ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरले. ही ट्रेन वाराणसीहून अहमदाबादला जात होती. रात्री ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त साबरमती एक्स्प्रेस ट्रेनमधील सर्व प्रवाशांना अपघातस्थळावरून बसने कानपूरला आणण्यात आले आहे.

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यासाठी आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. दरम्यान, अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण ट्रेनचे नुकसान झाले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या अपघाताला लोको पायलट दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आहेत.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा