राष्ट्रीय

उत्तर भारतात थंडीची लाट कायम; धुक्यामुळे जनजीवन अद्यापही थंडावलेलेच

पंजाबमध्ये पतियाळात ५.२ अंश सेल्सिअस, गुरुदासपूर ५.५ अंश सेल्सिअस तर लुधियानात ६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Swapnil S

चंदिगड : पंजाब आणि हरयाणामध्ये रविवारीही थंडी कायम राहिली तसेच दोन्ही राज्यांतील बहुतेक ठिकाणी मध्यम ते दाट धुके होते. स्थानिक हवामान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, हरयाणातील हिस्सार तीव्र थंडीने त्रस्त झाले असून, किमान तापमान २.८ अंश सेल्सिअस होते. फरीदाबादलाही थंडीने कुडकुडवून टाकले आहे. तेथे किमान तापमान ३.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. भिवानीमध्ये किमान तापमान ३.९ अंश सेल्सिअस, झज्जरमध्ये ४.१ अंश सेल्सिअस आणि फतेहाबाद, गुरुग्राम आणि रोहतक येथे प्रत्येकी ४.६ अंश सेल्सिअस अंबाला येथे किमान तापमान ५.७ अंश सेल्सिअस, तर कर्नाल आणि नारनौल येथे प्रत्येकी ५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. चंदिगगडमध्ये ५.७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले.

पंजाबमध्ये पतियाळात ५.२ अंश सेल्सिअस, गुरुदासपूर ५.५ अंश सेल्सिअस तर लुधियानात ६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याकडून ‍यांनी सांगितले की, पंजाब आणि हरयाणातील बहुतेक ठिकाणी सकाळी मध्यम ते दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी