राष्ट्रीय

तांबड्या समुद्रातील संघर्ष मालभाड्याच्या मुळावर

या संघर्षामुळे मालवाहतुकीचे भाडे २५ ते ३० टक्क्यांनी वाढण्याची दाट शक्यता आहे.

Swapnil S

मुंबई : तांबड्या समुद्रात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम जागतिक मालवाहतुकीवर होत आहे. या संघर्षामुळे मालवाहतुकीचे भाडे २५ ते ३० टक्क्यांनी वाढण्याची दाट शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार करणाऱ्या कंपन्यांना त्याचा फटका बसेल, असा अहवाल ‘इंड-रा’ या पतमान संस्थेने दिला आहे. गेल्या १५ ते २० दिवसात खेळत्या भांडवली खर्चात वाढ झाली. त्यामुळे कृषी, वस्त्रोद्योग क्षेत्राला अधिक पैसे मोजावे लागतील. कंपन्यांच्या कॅश फ्लोवर परिणाम होणार असून त्यांना कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. लोखंड, पोलाद, वाहन व वाहनांचे सुटे भाग, रसायन व वस्त्रोद्योग आदींना फटका बसू शकतो. तसेच कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो. मध्यम क्षमतेच्या कंपन्यांना मोठे आव्हान पेलावे लागेल. कारण त्यांचा खर्च वाढणार आहे. गेल्या ४५ दिवसांत मालवाहतुकीच्या भाड्यात १५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या भागातून ४० टक्के तेल आयात केले जाते तर निर्यात २४ टक्के होते, असे अहवालात नमूद केले. जगातील बहुतांश मालवाहतूक कंपन्यांनी त्यांची जहाजे ही केप ऑफ गुड होप या मार्गाने नेण्यास सुरुवात केली. त्यामुळे मालवाहतुकीचा खर्च व वेळ वाढला आहे.

ज्ञानेशविरोधात आंदोलनाचा भडका; CJP नेत्यांची विमानातच धरपकड; दिल्लीत ७,००० जण ताब्यात; ..तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार!

ज्ञानेशसह हे सरकारही जाईल - राहुल गांधी

Mumbai : तुषार गांधींसाठी ठाकरे गटाचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह शिवसैनिकांची धाव

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक; कामेंग आणि उखरुड जिल्ह्यात झालेल्या गोळीबारात ३ जणांचा मृत्यू

Satara : माण, खटाव, फलटण, खंडाळ्यात भीषण स्थिती