राष्ट्रीय

विरोधी आघाडीच्या 'INDIA' नावावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका ; म्हणाले, "इंडियन मुजाहिद्दीनच्या..."

विरोधकांना बराच काळ सत्तेत येण्याची इच्छा नाही असं त्यांचा दृष्टीकोन पाहून दिसतंय, असं देखील मोदी म्हणाले

नवशक्ती Web Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विजयी घोडदौड २०२४ च्या आगामी लोकसभा निवडणुकीत रोखण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एकत्र येण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. विरोधी पक्षाची पहिली बैठक बिहारच्या पाटण्यात पार पडली. त्यानंतर १८ आणि १९ जुलै रोजी बंगळूर विरोधी पक्षांची दुसरी बैठक पार पडली. या आधी काँग्रेस प्रणित विरोधी पक्षांच्या आघाडीला युपीए असं नाव होतं. मात्र बंगळुरुत विरोधकांच्या आघाडीच INDIAअसं नामकरण करण्यात आलं. भाजपच्या आक्रमक राष्ट्रवादाला उत्तर देण्यसाठी विरोधकांनी NATIONAL DEMOCRATIC INCLUSIVE ALLIANCE म्हणजेचं INDIA असं ठेवलं असल्याची चर्चा आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या आघाडीच्या नावावरुनचं हल्लाबोल केला आहे. संसदेच्या आधिवेशनात मणिपूरच्या मुद्यावरुन मोठा गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या आघाडीवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. आघाडीचं नाव केवळ 'इंडिया' ठेवल्याने काही फरक पडणार नाही. ईस्ट इंडिया कंपनीने देखील 'इंडिया' हे नाव लावले होते आणि इंडियन मुजाहिद्दीनच्या नावातही 'इंडिया' आहे. असा टोला पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना लगावला.

यावेळी बोलताना त्यांनी विरोधक विखुरलेले आणि हताश झाले असल्याचं सांगितलं. तसंच त्यांना बराच काळ सत्तेत येण्याची इच्छा नाही, असं त्यांचा दृष्टीकोन पाहून दिसतंय, असं देखील मोदी म्हणाले. विरोधकांना नैराश्याने घेरलेलं असून त्याची दिशा हरवली आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

नवीन GST सुधारणांमुळे ग्राहकांना दिलासा; आजपासून अन्न, गृहनिर्माण, इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, वाहने, शेती, आरोग्यसेवा स्वस्त

आजपासून GST बचत उत्सव! पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा : स्वदेशी, स्वावलंबनावर भर; जनतेची २.५ लाख कोटींपेक्षा जास्त बचत होणार

मतदार यादी सखोल परीक्षणासाठी सज्ज व्हावे; केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश

राज्यात नवरात्रोत्सवाची धूम; ठाण्यात बाजारपेठांमध्ये गर्दी

भिवंडीत तीन संशयित दहशतवाद्यांना अटक; उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई