राष्ट्रीय

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी होणार; नेमकं प्रकरण काय?

दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी होणार आहे

नवशक्ती Web Desk

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची सीबीआय चौकशी होणार आहे. मद्य घोटाळ्याप्रकरणी त्यांची सीबीआयकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांना १६ एप्रिलला सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. दिल्लीत उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने सुरु केलेले नवे मद्य धोरण हे त्यांच्या अटकेचे कारण असल्याचे सांगितले जात आहेत. या धोरणावरुन मनीष सिसोदिया यांची यापूर्वीही अनेकदा चौकशी झालेली आहे. त्यानंतर सीबीआयने उपमुख्यमंत्री सिसोदिया चौकशीत सहकार्य करत नसल्याचे कारण दिले आणि त्यांना अटक केली आहे.

दरम्यान, मागच्या वर्षी जुलैमध्ये दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे एक अहवाल सादर केला होता. या अहवालामध्ये मनीष सिसोदियांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. मद्य परवाना देताना त्याऐवजी कमिशन घेतले गेले. त्यानंतर हा पैसा आपने पंजाब विधानसभा निवडणुकीत वापरला, असा गंभीर आरोप मनीष सिसोदियांवर करण्यात आला. यानंतर ईडी आणि सीबीआयने प्रकरणाची चौकशी करण्यात सुरुवात केली.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन