राष्ट्रीय

बंगालमधील सिनेसृष्टीत काम करणारी अर्पिताच्या घरावर ईडी चा छापा

वृत्तसंस्था

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याचा तपास राज्य सरकारच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. यामध्ये 20 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. शुक्रवारी पार्थ चॅटर्जीच्या घरावरही छापे टाकण्यात आले होते. अशा परिस्थितीत अर्पिता मुखर्जी कोण आहे आणि त्या पार्थ चॅटर्जीच्या निकटवर्तीय कश्या बनल्या असा प्रश्न आहे.

ईडीच्या छाप्यांमुळे चर्चेत आलेल्या अर्पिता मुखर्जी बंगाली चित्रपटसृष्टीत काम करत होत्या. अर्पिता मुखर्जीने त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये साइड रोल म्हणून काम केले आहे. बंगाली सिनेमांव्यतिरिक्त त्यांनी ओरिया आणि तमिळ सिनेमांमध्येही काम केले आहे. अर्पिता मुखर्जीने बंगाली सुपरस्टार प्रोसेनजीत आणि जीत यांच्यासोबत काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. अमर अंतरनाड या चित्रपटात त्यांनी काम केले. ईडीच्या कारवाईदरम्यान अर्पिताच्या घरातून २० कोटींची रोकड सापडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे केंद्रीय तपास यंत्रणांनी सांगितले.

अर्पिता मुखर्जी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय आहेत. चॅटर्जी सरकारमध्ये शिक्षणमंत्री आहेत. मग चित्रपटात साईड रोलचे काम करणारी अर्पिता व पार्थ चॅटर्जी एकमेकांना कसे ओळखतात, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तृणमूल नेते आणि मंत्री पार्थ चॅटर्जी दक्षिण कोलकाता येथील लोकप्रिय दुर्गा पूजा समितीचे प्रमुख आहेत. कोलकात्यात ही सर्वात मोठी दुर्गा पूजा समिती आहे. अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जीच्या २०१९ आणि २०२० मध्ये झालेल्या दुर्गापूजा समारंभाचा मुख्य चेहरा होती. तेव्हापासून दोघेही एकमेकांना ओळखू लागले.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

मोदींच्या बुलडोझरच्या वक्तव्याला इंडिया आघाडीचा आक्षेप; निवडणूक आयोगाने मोदींवर कारवाई करावी - खर्गे

क्रॉफर्ड मार्केटने टाकली कात, लवकरच मुंबईकरांच्या सेवेत

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार