राष्ट्रीय

'या' कारणामुळे पाटणा विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग ; लखनऊहून मागवण्यात आलं दुसरं विमान

या विमानात १८१ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

नवशक्ती Web Desk

आज (४ ऑगस्ट) रोजी सकाळी दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E 2433 या फ्लाईटचे पाटणा विमाणतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर तीन मिनीटांनी विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. विमानाच्या पायलटने याबाबतची माहिती दिली आणि इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. यानंतर त्यांना तात्काळ लँडिंगची परवानगी देण्यात आली आणि विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आलं. पाटणा विमानतळाच्या संचालकांनी याबाबतची माहिती दिली आहे.

या विमानाचं सकाळी ९ वाजून ११ मिनिटांनी सुरक्षित लँडिंक करण्यात आलं. यानंतर विमानतळाचं कामकाज सुरळीत सुरु आहे. इमर्जन्सी लँडिंगमुळे प्रवाश्यांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता पसरली मात्र, लँडिंग सुरक्षितरित्या झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या विमानात १८१ प्रवासी प्रवास करत होते. विमानातील तांत्रिक अडचण दूर झाली तरी हे विमान दिल्लीला पाठवली जाणार नाही. यासाठी लखनऊ येथून दुसरे विमान मागवले असून त्या विमानाने या सर्व प्रवाश्यांनी दिल्ली रवाना करण्यात येणार आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी