राष्ट्रीय

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन भाजपमध्ये

झारखंडचे माजी मुख्यमंत्री व झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी नेते चंपाई सोरेन यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

Swapnil S

रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री व झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी नेते चंपाई सोरेन यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदेश भाजपने सोरेन यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा व केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते.

भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर चंपाई यांनी हेमंत सोरेन यांच्यावर हेरगिरी करण्याचा आरोप केला. ते म्हणाले, माझी दिल्लीपर्यंत हेरगिरी केली. झारखंड मुक्ती मोर्चाचे मी राज्यात भरपूर काम केले. त्याच पक्षातून मला बाहेर काढले. पक्षात माझा अपमान झाला. त्यामुळे मी राजकीय संन्यास घेण्याचे ठरवले. पण, राज्यातील जनतेचे प्रेम व समर्थन पाहून राजकारणात राहण्याचा निर्णय मी घेतला. मी संघर्ष करणारा माणूस असून, आयुष्यात अनेक चढ-उतार बघितले आहेत. स्वत: पक्ष बनवेन किंवा चांगला पक्ष मिळाल्यास त्यात सामील होऊ, असा विचार मी केला होता. मी अनेक पक्षांचा विचार केला. देशात भाजप व काँग्रेस हे दोन मोठे पक्ष आहेत. पण, काँग्रेसने आंदोलनामध्ये आदिवासींवर गोळीबार केला. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. संथाल परगणा व आदिवासींना वाचवण्याचे काम केवळ भाजपच करू शकतो, असे सोरेन म्हणाले.

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

ओबीसी महासंघाचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती; पूर आणि भूस्खलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

मुंबई, उपनगरात ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल; ५ सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी आता ८ सप्टेंबरला

१३ सप्टेंबरला मोदी मणिपूर दौऱ्यावर? कुकी समूहासोबत शांतता करार