राष्ट्रीय

२०० जणांची २ कोटींची फसवणूक; ट्रम्प यांचा बनावट एआय व्हिडीओ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचे ॲॅप तयार करून एका टोळीने २०० हून अधिक जणांची २ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. बंगळुरू, तुमकूर, मंगळूर आणि हवेरी या शहरांमध्ये हे घोटाळे झाल्याचे उघड झाले.

Swapnil S

बंगळुरू : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचे ॲॅप तयार करून एका टोळीने २०० हून अधिक जणांची २ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. बंगळुरू, तुमकूर, मंगळूर आणि हवेरी या शहरांमध्ये हे घोटाळे झाल्याचे उघड झाले.

फसवणूक करणाऱ्यांनी सोशल मीडिया पोर्टलवर एआय टूल्स वापरून करून ट्रम्प यांचा एक व्हिडीओ प्रसारित केला. त्याद्वारे गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखविले. लोकांनी व्हिडीओसोबत असलेल्या क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा फसवणूक करणारे त्यांना त्यांच्या जाळ्यात अडकवण्यात यशस्वी झाले.

हवेरी सायबर क्राइम इकॉनॉमिक्स अँड नार्कोटिक्स (सीईएन) चे निरीक्षक शिवशंकर आर. गणाचारी म्हणाले, "या संशयितांनी गुंतवणुकीसाठी भरपूर परतावा आणि घरून काम करण्याची संधीचे आमिष दाखविले. एकट्या हवेरीमध्ये १५ हून अधिक लोक यात फसले आहेत." संशयितांनी केलेल्या अॅप्सपैकी एक ‘ट्रम्प हॉटेल रेंटल’ असे होते. हे ॲप इन्स्टॉल केल्याने त्यांची गुंतवणूक दुप्पट होईल, असेही आमिष होते. आमची खाती सेट करण्यासाठी दीड हजार रुपये देण्यास सांगितले, असे एका पीडितेने पोलिसांना सांगितले.

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता

मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लॉटरी! मिळणार ५०० चौरस फुटांचे घर; शासकीय भूखंडावरील अतिक्रमणधारकांना राज्य सरकारचा दिलासा

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा