राष्ट्रीय

नाफेडकडून कांद्याला कमी दर शेतकऱ्यांमध्ये संताप : २२७४ प्रतिक्विंटल दराने खरेदी

बुधवारच्या तुलनेत १०० ते २५० रुपये कमी भावाने विक्री झाली

नवशक्ती Web Desk

लासलगाव :केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २ लाख टन कांदा २४१० रुपये प्रति क्विंटलने दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र गुरुवारी नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर कांद्याला प्रति क्विंटल २२७४ रुपये दर जाहीर झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दुसरीकडे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही प्रमाणात कांद्याचे दर वाढल्याचे चित्र दिसले. मात्र, नाफेडने कांदा दर वाढवण्याऐवजी १२५ रुपये प्रति क्विंटरने दर कमी केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

केंद्राने ‘नाफेड’मार्फत २४१० प्रति क्विंटलने कांदा खरेदी केला जाईल, असे जाहीर केले. मात्र, आठ ते दहा दिवसांमध्येच त्यांनी कांदा खरेदीचा दर कमी करत २२७४ रुपये प्रति क्विंटल असा केल्याने आपली फसवणूक झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

भावात किंचित सुधारणा

दरम्यान, येथील बाजार समितीच्या आवारात १०४२ वाहनांमधील १४,९७८ क्विंटल कांद्याचा लिलाव झाला. किमान ८०१, तर कमाल २४९१ रुपये सरासरी २३५१ रुपये दराने विक्री झाली. बुधवारच्या तुलनेत १०० ते २५० रुपये कमी भावाने विक्री झाली.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल