विधात्यानेच आपले रक्षण केले - डॉ. फारूक अब्दुल्ला 
राष्ट्रीय

विधात्यानेच आपले रक्षण केले - डॉ. फारूक अब्दुल्ला

नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते फारूक अब्दुल्ला हे बुधवारी रात्री प्राणघातक हल्ल्यातून सुदैवाने बचावले.

Swapnil S

जम्मू : नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते फारूक अब्दुल्ला हे बुधवारी रात्री प्राणघातक हल्ल्यातून सुदैवाने बचावले. विधात्यानेच आपले रक्षण केले, अशी प्रतिक्रिया अब्दुल्ला यांनी व्यक्त करतानाच त्यांनी एका शाही समारंभातील सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित केला.

आपल्याला विधात्यानेच वाचविले, अशी प्रतिक्रिया व्यक्त करतानाच बुधवारी रात्रीचा प्रसंग सांगितला. विवाह मंडपातून आपणबाहेर पडत असताना आपल्याला आवाज ऐकू आला, मात्र तो फटाक्यांचा आवाज असावा असे प्रथम आपल्याला वाटले, असे अब्दुल्ला म्हणाले.

कालांतराने आपल्याला कानामागे काहीतरी जळजळत असल्याची जाणीव झाली, नक्की काय झाले ते कळलेच नाही. दरम्यानच्याय काळात सुरक्षा रक्षकांनी आपल्याला गाडीत ढकलले आणि हल्लेखोराकडे पिस्तूल होते असे सांगितले. हल्लेखोराने आपल्यावर दोन गोळ्या झाडल्या, असेही सुरक्षा रक्षकांनी सांगितले, असे अब्दुल्ला म्हणाले.

अब्दुल्लांना मारण्याचा गेल्या २० वर्षांपासून प्रयत्न होता, हल्लेखोराची जबानी

दरम्यान, गेल्या २० वर्षांपासून फारूक अब्दुल्ला यांना मारण्याचा प्रयत्न करीत होतो, असे हल्लेखोर कमलसिंह जमवाल याने सांगितले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गोळीबार का केला, याबाबत चौकशी सुरू आहे. घटनेच्या वेळी तेथे कोणताही पोलीस कर्मचारी किंवा सुरक्षा अधिकारी उपस्थित नव्हता,असे उपमुख्यमंत्री चौधरी यांनी म्हटले आहे.

पोलिसांना दिलेल्या जबाबात, गोळीबार करणारा कमल सिंग जामवाल याने गेल्या २० वर्षांपासून फारुख अब्दुल्ला यांना मारण्याचे प्रयत्न करत असल्याचे सांगितले, संधी मिळाली. पण, प्रयत्न अयशस्वी झाल्याचेही तो म्हणाला.

"...तर महिलांना कोणी नोकरी देणार नाही"; मासिक पाळी रजेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Mumbai : पालिका शाळाही ‘गॅस’वर; मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना फळ वाटप, रुग्णालयांत सिलिंडर पुरवठा करण्यासाठी गॅस कंपनीला पत्र

घरगुती गॅस पुरवठ्यावर सरकारची नजर; जिल्हास्तरीय समित्या स्थापन, अफवांवर कारवाईचा इशारा

ST डेपोच्या विकासासाठी भाडेकराराला ९८ वर्षांपर्यंत वाढ; सरकारकडे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी दाखल

'गॅस अपडेट'च्या नावाने ऑनलाइन फसवणूक; कल्याण-डोंबिवलीत दोन महिलांना ४ लाखांचा गंडा