राष्ट्रीय

हरियाणातील धार्मिक मिरवणुकीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी FIR दाखल

नवशक्ती Web Desk

हरियाणामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने नूह येथे काढलेल्या धार्मिक मिरवणुकीवेळी अचानकपणे काही समाजकंटकाकडून दगडफेक करण्यात आली. यावेळी उसळलेल्या दंगलीत सुमारे २,५०० लोकांना मंदिरात आसरा घ्यावा लागला होता.

या घटनेबाबत पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. यात पोलिसांनी म्हटलं आहे की, नल्हार येथील शिवमंदिरापासून विश्वहिंदू परिषदेची मिरवणूक निघाली. यावेळी ८०० ते ९०० जणांच्या जमावाने 'पाकिस्तान जिंदाबाद' आणि 'अल्लाह हू अकबर'च्या घोषणा दिल्या. तसंच लाठ्या, दगड आणि बेकायदेशीर शस्त्रे घेऊन मंदिराकडे कूच केली. तसंच या एफआयआरमध्ये असंही म्हटलं आहे की, जवळच्या शेतातून शिव मंदिरावर हल्ला करण्यात आला. शेकडो लोकांनी दगडफेक केली. तसंच काठ्या आणि पेट्रोल बॉम्बने हल्ला केला. असं सांगण्यात आलं आहे.

हरियाणातील नूहमध्ये धार्मिक मिरवणुकीवर दगडफेक आणि गाड्या पेटवल्यानंतर अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला. यावेळी झालेल्या हिंसाचारात दोन होमगार्ड आणि एक मौलवीसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच गुरुवारी गुरुग्राममध्ये एका मशिदीला लागलेल्या आगीनंतर राज्या हिंसाचाराची नोंद झाली तर हरियाणाच्या नूह जिल्ह्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, अशी माहिती पीटीआयला पोलिसांनी दिली आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त