राष्ट्रीय

तुम्ही अजुनही २००० रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्या नाहीत का ? आरबीआयच्या आदेशानुसार उद्या शेवटची मुदत

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत २००० रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश दिले आहे

नवशक्ती Web Desk

आज 30 सप्टेंबर असून आरबीआयने दिलेल्या आदेशानुसार २००० रुपयांच्या नोटा बदलायचा आज शेवटचा दिवस. तुमच्याकडे २००० रुपयांच्या नोटा असतील तर त्या लवकर बदलून घ्या, कारण भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत २००० रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणी RBI ने 30 सप्टेंबरनंतर 2000 रुपयांची नोट कायदेशीर टेंडर राहील की नाही हे मात्र स्पष्ट केलेलं नाही.

RBI २ हजाराच्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत वाढवू शकते का? असा देखील प्रश्न लोकांकडून विचारला जात आहे. लोक २ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी शेवटच्या क्षणी बँकांमध्ये पोहोचत आहेत. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, मे २०२३ रोजी बँकांमध्ये २००० रुपयांच्या नोटा जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. 30 सप्टेंबर ही शेवटची मुदत आरबीआयकडून देण्यात आली होती. भारतात सुमारे ३.६२ लाख कोटी रुपयांच्या २ हजारांच्या नोटा चलनात होत्या. ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत ३.३२ लाख कोटी रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप संपूर्ण नोटा परत आलेल्या नाहीत.

अशा परिस्थितीत २ हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याची किंवा बँकेत जमा करण्याची मुदत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण सध्या बाजारात सुमारे २४ हजार कोटी रुपयांच्या २ हजार रुपयांच्या नोटा शिल्लक आहेत. बँकांनी लोकांना विनंती केली आहे की त्यांनी लवकरात लवकर 2000 रुपयांच्या नोटा जमा कराव्यात जेणेकरून पुढे कोणतीही अडचण येऊ नये.

केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. यानंतर देशात ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. या निर्णयाच्या ७ वर्षानंतर २ हजार रुपयांची नोट पुन्हा आरबीआयने बँकेत जमा करण्याचे आदेश जारी केले होते. सर्व बँकांनी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २ हजार रुपयांच्या चलनी नोटा जमा आणि बदलून देण्याची सुविधा देण्याची घोषणा केली आहे.

संजय राऊत यांना गंभीर आजार; बाहेर जाण्यास, गर्दीत मिसळण्यास निर्बंध, पोस्ट करीत म्हणाले - 'नवीन वर्षात भेटू'

New Rules From November 1: उद्यापासून बँकिंग, GST, आधार आणि पेन्शनमध्ये मोठे बदल; तुमच्यावर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

Powai Hostage Case : 'तो आधी फ्रेंडली होता, नंतर...'; ओलिस ठेवलेल्या मुलीने सांगितला घटनेचा थरार

Powai Hostage Case : माजी मंत्री दीपक केसरकरांचा जुना व्हिडिओ व्हायरल; रोहित आर्यच्या प्रकल्पाचं केलं होतं कौतुक

कल्याणमध्ये ३० वर्षांपासून राहणाऱ्या नेपाळी महिलेचा पर्दाफाश; भारतीय कागदपत्रांसह मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात