राष्ट्रीय

मेमध्येही उष्णतेच्या लाटांचा तडाखा; सरासरीपेक्षा अधिक तापमान वाढीचा हवामान खात्याचा इशारा

Swapnil S

नवी दिल्ली : यंदाच्या एप्रिल महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटांमुळे लोक चांगलेच भाजून निघाले. त्यात आता मेमध्येही उष्णतेच्या लाटांचा तडाखा कायम राहणार असून, देशाच्या विविध भागात मेमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील, असा इशारा भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी दिला आहे.

एप्रिलमध्ये मुंबई, ठाणे, रायगडसह देशाच्या विविध भागात उष्णतेच्या लाटा आल्या व सर्वसाधारण तापमान ४० ते ४३ अंशाच्या आसपास नोंदवले गेले.

आता भारतीय हवामान खात्याने मे महिन्याचा हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. पूर्व-उत्तर-पश्चिम व मध्य भारताचा काही भाग वगळता संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे. दक्षिण राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाड़ा, गुजरातमध्ये पाच ते आठ अतिरिक्त दिवस उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाज आहे.

पूर्व, ईशान्य भारतात १९०१ नंतर किमान तापमानात वाढ

पूर्व व ईशान्य भारतात एप्रिलमध्ये किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. १९०१ नंतरचे हे सर्वात जास्त तापमान आहे. एप्रिलमध्ये यंदा हवेचा जोर कमी असल्याने पूर्व व ईशान्य भारतात तापमान अधिक होते.

दक्षिण भारतात ३१ अंश किमान तापमानाची नोंद

दक्षिण भारतात एप्रिलमध्ये किमान तापमान ३१ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. १९०१ नंतर प्रथमच हे सर्वात जास्त किमान तापमान आहे. १९८० नंतर दक्षिण भारतात सामान्यापेक्षा अधिक तापमान वाढत आहे. दरम्यान, ओदिशात २०१६ नंतर पहिल्यांदाच एप्रिलमध्ये १६ दिवस उष्णतेच्या लाटांची झळ बसली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस