लालू प्रसाद  संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

आम्ही असताना भाजप बिहारमध्ये सरकार कसे बनविणार - लालू प्रसाद

महाराष्ट्र आणि दिल्लीतील निवडणुका जिंकल्यानंतर बिहार जिंकण्यासाठी पावले उचलत असलेल्या भाजपला राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आव्हान दिले आहे.

Swapnil S

पाटणा : महाराष्ट्र आणि दिल्लीतील निवडणुका जिंकल्यानंतर बिहार जिंकण्यासाठी पावले उचलत असलेल्या भाजपला राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आव्हान दिले आहे. दिल्लीच्या निकालांचा बिहारमधील विधानसभा निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही, असा दावा लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.

देशातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. त्यामुळे दिल्ली विधानसभेची निवडणूक आटोपल्यानंतर बिहारमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. दरम्यान, हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीतील निवडणुका जिंकल्यानंतर बिहार जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी करत असलेल्या भाजपला राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आव्हान दिले आहे. दिल्लीच्या निकालांचा बिहारमधील विधानसभा निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही, असा दावा लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.

लालूप्रसाद यादव म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीवर दिल्लीतील निवडणुकीत लागलेल्या निकालाचा काही परिणाम होणार नाही. आम्ही असताना भाजप बिहारमध्ये सरकार कसे स्थापन करणार, जनतेनेही आता भाजपला ओळखले आहे.

भाजपनेही यावर पलटवार केला आहे. भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल म्हणाले की, बिहारमधील लालूप्रसाद यादव यांचे राजकारण संपले आहे. लालूप्रसाद यादव हे आपल्या कुटुंबापलीकडे विचार करत नसल्याचे जयस्वाल म्हणाले.

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

पहिल्या आठवड्याचे फलित काय?

मराठी पाऊल पडते पुढे

जुलै महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य