राष्ट्रीय

मणिपुरात कुकींचा अनिश्चित काळासाठी बंद; अतिरिक्त फौजफाटा तैनात

मणिपूरमध्ये मुक्तपणे वाहतूक सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी सुरक्षा दल व आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत ४० जण जखमी झाले.

Swapnil S

इम्फाळ : मणिपूरमध्ये मुक्तपणे वाहतूक सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी सुरक्षा दल व आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत ४० जण जखमी झाले. दरम्यान, सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईविरोधात कुकी समाजाच्या लोकांनी अनिश्चित काळासाठी बंद पुकारला असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा दलांनी अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे.

मणिपूर पोलिसांनी सांगितले की, आंदोलकांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला आहे. सुरक्षा दलांच्या ५ वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. कुकी समाजाने रस्त्यावर दगड टाकून टायर जाळले. अनेक ठिकाणी वाहनांना आगी लावल्या. बस पलटी करून टाकल्या. त्यानंतर सुरक्षा दलांनी आंदोलकांवर लाठीचार्ज व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

महामार्गावर गस्त सुरू

कांगपोकपी जिल्ह्यातील अधिकाऱ्याने सांगितले की, ‘एनएच-२’मधील (इंफाळ-दिमापूर) गमघीफई आणि अन्य भागात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले आहे. या महामार्गावर पोलिसांची गस्त सुरू आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस