राष्ट्रीय

जैवतंत्रज्ञान क्षेत्रात लवकरच भारताचा समावेश होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी नवी दिल्लीत प्रगती मैदान येथे आयोजित केलेल्या जैवतंत्रज्ञान स्टार्टअप एक्स्पो - २०२२चे उद्घाटन झाले

वृत्तसंस्था

गेल्या आठ वर्षात भारताच्या जैव अर्थव्यवस्थेत आठ पटींनी वाढ झाली असून १० अब्ज अमेरिकी डॉलर्स वरून ८० अब्ज डॉलर्स वृद्धीची नोंद झाली आहे. जैवतंत्रज्ञानातील जागतिक परिसंस्थेत अग्रणी दहा राष्ट्रांमध्ये भारताचा समावेश होण्याचा दिवस आता फार दूर नाही, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी नवी दिल्लीत प्रगती मैदान येथे आयोजित केलेल्या जैवतंत्रज्ञान स्टार्टअप एक्स्पो - २०२२चे उद्घाटन झाले. त्यांच्या हस्ते जैवतंत्रज्ञान उत्पादनांच्या ई पोर्टलचे लोकार्पणही झाले. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, डॉ जितेंद्र सिंग, बायोटेक क्षेत्रातील तज्ञ आणि भागधारक, लघू आणि मध्यम उद्योजक तसेच गुंतवणूकदार उपस्थित होते. देशात जैवतंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासात योगदान दिल्याबद्दल पंतप्रधानांनी जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषदेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. देश सध्या अमृत काळाच्या युगात असून निरनिराळे संकल्प करत असताना देशाच्या विकासात जैवतंत्रज्ञान उद्योगाची भूमिका अतिशय महत्वाची ठरेल, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले, आमच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांच्या कौशल्यावर आणि अभिनवतेवर जगाने दाखवलेला विश्वास नवीन उंची गाठत आहे. या दशकात तोच आदर आणि प्रतिष्ठा जैवतंत्रज्ञान क्षेत्रासाठी आणि या क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्तींसाठी दिसून येते आहे. जैवतंत्रज्ञान क्षेत्रात भारताला अमाप संधींची भूमी म्हणून संबोधण्यामागे पाच मुख्य कारणं आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. पहिले - वैविध्यपूर्ण लोकसंख्या आणि वैविध्यपूर्ण हवामान क्षेत्र, दुसरे- भारताचे प्रतिभावंत मनुष्यबळ, तिसरे - भारतात व्यवसाय सुलभीकरणासाठी होत असलेले प्रयत्न, चौथे- भारतात जैव-उत्पादनांची सातत्याने वाढणारी मागणी आणि पाचवे- भारतातील जैवतंत्रज्ञान क्षेत्र आणि त्याच्या यशस्वितेचा उंचावणारा आलेख आहे. जैवतंत्रज्ञान क्षेत्रासाठीही अभूतपूर्व पावले उचलली जात आहेत, नवउद्यम (स्टार्ट अप्स) परिसंस्थेत ती स्पष्ट दिसून येतात. “गेल्या ८ वर्षात देशात नवउद्यमांची संख्या काही 'शे' वरुन ७० हजारांपर्यंत वाढली आहे. हे ७० हजार नवउद्यम सुमारे ६० वेगवेगळ्या उद्योगांमध्ये उभे राहिले आहेत.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश