समुद्रात अडकलेल्या रशियन तेलाची भारतीय कंपन्यांकडून खरेदी; अमेरिकेकडून महिन्याभराची सवलत मिळाल्याचा परिणाम 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

समुद्रात अडकलेल्या रशियन तेलाची भारतीय कंपन्यांकडून खरेदी; अमेरिकेकडून महिन्याभराची सवलत मिळाल्याचा परिणाम

प. आशियातील पुरवठा व्यत्ययामुळे निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी देशाजवळील टँकरमध्ये समुद्रात अडकून पडलेल्या सुमारे १५ दशलक्ष पिंप रशियन कच्च्या तेलाच्या मालाची खरेदी सुरू केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : प. आशियातील पुरवठा व्यत्ययामुळे निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी देशाजवळील टँकरमध्ये समुद्रात अडकून पडलेल्या सुमारे १५ दशलक्ष पिंप रशियन कच्च्या तेलाच्या मालाची खरेदी सुरू केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने समुद्रात अडकलेल्या रशियन तेलाच्या मालाची खरेदी करण्यासाठी भारताला ३० दिवसांची तात्पुरती परवानगी दिल्यानंतर भारतीय तेल कंपन्यांनी खरेदी वाढवली आहे.

रशियन तेलाचा मोठा खरेदीदार असलेल्या भारताने युक्रेन युद्धासाठी मॉस्कोला मिळणारा आर्थिक प्रवाह कमी करण्याच्या प्रयत्नात अमेरिकेने दिलेल्या दबावानंतर रशियन तेल खरेदी कमी केली होती.

फेब्रुवारीत भारताची रशियन कच्च्या तेलाची आयात दररोज १.०४ दशलक्ष पिंपावर आली, जी नोव्हेंबर २०२२ नंतरची सर्वात कमी पातळी आहे. अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील शुल्क कपात करण्यासाठी भारताने रशियन कच्च्या तेलाची खरेदी कमी करावी, अशी अट घातली होती. यामुळे रशियन तेलाने भरलेली जहाजे समुद्रात अडकली होती.

अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी सांगितले की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऊर्जा धोरणामुळे तेल आणि वायू उत्पादन ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहे. जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी अर्थविभाग भारतीय तेल कंपन्यांना समुद्रात अडकलेल्या रशियन तेलाच्या खरेदीसाठी ३० दिवसांची सवलत देत आहे. ही तात्पुरती उपाययोजना असून भविष्यात भारताने अमेरिकेकडून अधिक तेल खरेदी करावी, असे ते म्हणाले.

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल