राष्ट्रीय

भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स पुन्हा ५९ हजारांवर

वृत्तसंस्था

भारतीय शेअर बाजारात सोमवारी दोन्ही निर्देशांक जवळपास १ टक्का वधारले. त्यामुळे सेन्सेक्स पुन्हा ५९ हजारांवर गेला. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँक आदी कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाली. दरम्यान, भारतीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८ पैशांनी मजबूत होऊन ७९.७९ हा नवा दर झाला.

दि बीएसई सेन्सेक्स ४४२.६५ अंक किंवा ०.७५ टक्का वधारून ५९,२४५.९८ वर बंद झाला. दिवसभरात तो ५०४.९२ अंक किंवा ०.८५ अंक वाढून ५९,३०८.२५ची कमाल पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १२६.३५ अंक किंवा ०.७२ टक्का वाढून १७,६६५.८०वर बंद झाला.

सेन्सेक्स वर्गवारीत सन फार्मा, आयटीसी, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन ॲण्ड टु्ब्रो, टाटा स्टील, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागात वाढ झाली. तर नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो, पॉवरग्रीड, एशियन पेंट्स‌ आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या समभागात घसरण झाली. आशियाई बाजारात सेऊल, टोकियोमध्ये घसरण तर शांघायमध्ये वाढ झाली होती. युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत घट झाली होती. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड २.८१ टक्के वधारून प्रति बॅरलचा भाव ९५.६३ अमेरिकन डॉलर झाला. तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी शुक्रवारी ८.७९ कोटींच्या समभागांची विक्री केली.

"...मी कोणाच्या बापाचेही ऐकत नाही", अजित पवार यांचा विरोधकांना इशारा

प्रादेशिक असमतोलाचे भान राखणे गरजेचे!

भय संपलेले नाही...

"अमेठी आणि रायबरेली दोन्ही माझं कुटूंब..." उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधींची भावनिक पोस्ट

संजय निरूपम यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा