राष्ट्रीय

भारताची आज सूर्याकडे झेप;आदित्य एल-१ यानाचे ११ वा. ५० मिनिटांनी प्रक्षेपण

इस्रोने या मोहिमेची तयारी पूर्ण केली असून प्रक्षेपणापूर्वीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे

नवशक्ती Web Desk

बंगळुरू : चांद्रमोहिमेच्या घवघवीत यशानंतर भारताच्या सूर्यमोहिमेला शनिवारपासून प्रारंभ होत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील तळावरून शनिवारी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी आदित्य एल-१ यानाचे प्रक्षेपण होत आहे.

इस्रोच्या पीएसएलव्ही सी ५७ प्रक्षेपकाद्वारे आदित्य एल- १ चे प्रक्षेपण होईल. प्रक्षेपणानंतर साधारण चार महिन्यांत १५ लाख किमीचा प्रवास करून आदित्य एल-१ यान अंतराळातील लाग्रान्ज बिंदू क्रमांक १ वर पोहोचेल. अंतराळात असे ५ लाग्रान्ज बिंदू आहेत. तेथे पृथ्वी आणि सूर्यामधील गुरुत्वाकर्षणाचे बल साधारणपणे समान होते. त्यामुळे कमीत कमी ऊर्जेत यान तेथे राहून सूर्याची निरीक्षणे करू शकते. या बिंदूवरून निरीक्षणे करताना ग्रहणांचा अडथळा येत नाही. आदित्य एल-१ यान सूर्याचे वातावरण, किरणे, तेथून बाहेर पडणारे विद्युतभारीत कण, सूर्याच्या पृष्ठभागावरील होणारी वादळे आदी बाबींचा अभ्यास करेल. त्यासाठी आदित्य एल-१ यानावर विविध प्रकारची सात शास्त्रीय उपकरणे बसवली आहेत.

इस्रोने या मोहिमेची तयारी पूर्ण केली असून प्रक्षेपणापूर्वीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. इस्रोचे संकेतस्थळ, फेसबुक पेज, यूट्यूब चॅनेल तसेच दूरदर्शन टेलिव्हिजन चॅनेलवरून या मोहिमेचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल.

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

महिला डॉक्टरचा हिजाब ओढला; नितीश कुमारांवर टीकेची झोड, "तुमची तब्येत ठीक नसेल तर...

लाइक, कमेंट अन् व्हायरल! Insta रिल्समुळे २० वर्षांच्या तरुणाला थेट IPL लिलावात एंट्री? कोण आहे इझाझ सावरिया?

कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने किडनी विकली; रोहित पवार आक्रमक, "या निर्दयी सरकारवर...

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय? २०१२ पासून आजपर्यंत काय घडलं?