प्रातिनिधिक छायाचित्र  एक्स (@TheUnderLineIN)
राष्ट्रीय

चंद्रावर २५० किलोचा रोवर उतरवणार; ‘चांद्रयान-५’ला केंद्राची मंजुरी

‘चांद्रयान-५’ या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी इस्रोतर्फे २५० किलोचा रोवर उतरवणार आहे, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितले. ‘चांद्रयान-५’ या मोहिमेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

Swapnil S

बंगळुरू : ‘चांद्रयान-५’ या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी इस्रोतर्फे २५० किलोचा रोवर उतरवणार आहे, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितले. ‘चांद्रयान-५’ या मोहिमेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

बंगळुरूत ‘इस्रो’च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, तीन दिवसांपूर्वीच आम्हाला चांद्रयान-५ ला मंजुरी मिळाली आहे. यात जपानचे आपल्याला सहकार्य असेल. ‘चांद्रयान-३’च्या मोहिमेसाठी २५ किलोचा रोवर नेला होता, तर ‘चांद्रयान-५’ मिशनसाठी २५० किलोचा रोवर नेला जाणार आहे.

२०२७ मध्ये ‘चांद्रयान-४’मध्ये चंद्रावरील मातीचे नमुने आणले जाणार आहेत, तर ‘गगनयान’सहित अनेक प्रकल्पांबरोबरच भारताचे स्वत:चे अंतराळ केंद्र उभारण्याच्या योजनांवर काम सुरू आहे.

यंदा तीन अंतराळवीर अंतराळात जाणार

यंदा गगनयानातून ३ दिवसांसाठी तीन अंतराळवीर पृथ्वीच्या कक्षेच्या ४०० किमी उंचीवर पाठवले जातील.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक