राष्ट्रीय

नौदलाला मिळणार बळ! 'इस्त्रो' लॉन्च करणार ४,४०० किलोचा सर्वाधिक वजनदार ‘सीएमएस-०३’ उपग्रह

‘चांद्रयान-३’ मिशनच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्त्रो’ आता बहुप्रतीक्षित ‘सीएमएस-०३’ सॅटेलाइट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. येत्या रविवारी २ नोव्हेंबरला हा सॅटेलाइट लॉन्च होणार आहे.

Swapnil S

बंगळुरू : ‘चांद्रयान-३’ मिशनच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्त्रो’ आता बहुप्रतीक्षित ‘सीएमएस-०३’ सॅटेलाइट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. येत्या रविवारी २ नोव्हेंबरला हा सॅटेलाइट लॉन्च होणार आहे. ‘इस्त्रो’ ४,४०० किलोचा सर्वाधिक वजनदार ‘सीएमएस-०३’ उपग्रह सर्वांत शक्तिशाली रॉकेट ‘एलव्हीएम-३’च्या सहाय्याने लॉन्च करणार आहे. ‘सीएमएस-०३’ हा नौदलासाठी खास विकसित केलेला उपग्रह आहे.

आंध्र प्रदेशातील श्री हरिकोटामधील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लॉन्च केल्यानंतर हा सॅटेलाइट कम्युनिकेशनच्या भविष्याला नवी दिशा देणार आहे. यामुळे भारताची तंत्रज्ञान क्षेत्रातील शक्ती वाढेल. देशातील कोट्यावधी नागरिकांच्या आयुष्यात डिजिटल क्रांती येईल.

नौदलासाठी वरदान

सीएमएस-०३ हे नौदलासाठी एक वरदान ठरणार आहे. हा उपग्रह नौदल ऑपरेशन्स, हवाई संरक्षण आणि स्ट्रॅटेजिक कमांड कंट्रोलसाठी उपयुक्त ठरेल. सागरी देखरेख, टेहळणी, नेव्हिगेशन आणि हवामान देखरेख यासारख्या वैशिष्ट्यांमुळे देशाच्या सागरी सुरक्षेला बळ मिळेल. तज्ज्ञांच्या मते, या उपग्रहामुळे दुर्गम भागात डिजिटल जाळे वाढवेल. यामुळे नागरी संस्थांनाही फायदा होईल.

संजय राऊत यांना गंभीर आजार; बाहेर जाण्यास, गर्दीत मिसळण्यास निर्बंध, पोस्ट करीत म्हणाले - 'नवीन वर्षात भेटू'

New Rules From November 1: उद्यापासून बँकिंग, GST, आधार आणि पेन्शनमध्ये मोठे बदल; तुमच्यावर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

Powai Hostage Case : 'तो आधी फ्रेंडली होता, नंतर...'; ओलिस ठेवलेल्या मुलीने सांगितला घटनेचा थरार

Powai Hostage Case : माजी मंत्री दीपक केसरकरांचा जुना व्हिडिओ व्हायरल; रोहित आर्यच्या प्रकल्पाचं केलं होतं कौतुक

कल्याणमध्ये ३० वर्षांपासून राहणाऱ्या नेपाळी महिलेचा पर्दाफाश; भारतीय कागदपत्रांसह मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात