राष्ट्रीय

देशाचे राष्ट्रपिता नाही, तर सुपुत्र असतात; कंगनाच्या पोस्टवरून वाद

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनीच, बुधवारी (दि.२) भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी, 'देशाचे राष्ट्रपिता नसतात, तर सुपुत्र असतात, धन्य आहेत ते भारतमातेचे सुपुत्र', अशी पोस्ट टाकून त्यासोबत कंगना यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे छायाचित्र ठेवले आहे.

Swapnil S

सिमला : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनीच, बुधवारी (दि.२) भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी, ‘देशाचे राष्ट्रपिता नाही, तर सुपुत्र असतात’, अशी पोस्ट टाकल्याने नवा वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, कंगना यांच्या पोस्टवरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून कंगना यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

देशाचे राष्ट्रपिता नसतात, तर सुपुत्र असतात, धन्य आहेत ते भारतमातेचे सुपुत्र, अशी पोस्ट टाकून त्यासोबत कंगना यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे छायाचित्र ठेवले आहे. कंगना रनौत या आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने अडचणीत सापडत असून त्यांच्या वक्तव्यानंतर स्पष्टीकरण देताना भाजपचीही चांगलीच कोंडी होत आहे. यापूर्वी त्यांनी शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे भाजपची चांगलीच पंचाईत झाली होती.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश