एक्स @beatsinbrief
राष्ट्रीय

कर्नाटकमध्ये मिनी बसची ट्रकला धडक; एकाच गावातील १३ भाविकांचा मृत्यू

व्हॅनमधून १७ जण प्रवास करत होते. त्यातील ११ जण जागीच ठार झाले, तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

Swapnil S

हावेरी : कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक मिनी बस रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात १३ भाविकांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, मृत शिवमोगा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील एमिहट्टी गावातील आहेत. ते देवी यल्लम्माचे दर्शन घेऊन बेळगावी जिल्ह्यातील सावदट्टी येथून परतत होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

बसचालकाला झोप लागल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच, पुढील तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. या व्हॅनमधून १७ जण प्रवास करत होते. त्यातील ११ जण जागीच ठार झाले, तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. चार जखमींपैकी दोघांना रुग्णालयाच्या आयसीयूत दाखल केले आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या समावेशाकडे लागले लक्ष... युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

IND vs ENG 2025 : क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी! लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून तिसरा सामना, मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर केलेली बदली रद्द; सहाय्यक प्राध्यापक महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा

भारतीय वंशाचे सबिह खान Apple चे नवे COO; लवकरच घेणार जेफ विल्यम्स यांची जागा

हॉटेल उद्योगावर मंदीचे सावट; शुल्क कमी न केल्यास ‘हॉटेल बंदचा’ व्यावसायिकांचा इशारा