राष्ट्रीय

अयोध्येप्रमाणेच काशी, मथुराही उजळून निघेल : योगी आदित्यनाथ

अयोध्येतील राम मंदिरात बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दीपोत्सव साजरा केला.

Swapnil S

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दीपोत्सव साजरा केला. अयोध्या हा प्रारंभ असून यापुढे काशी आणि मथुराही अयोध्येप्रमाणे लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघेल, असे यावेळी आदित्यनाथ म्हणाले. अयोध्या हा दुहेरी इंजिन सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाल्याचा पुरावा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दीपोत्सवासाठी जमलेल्या लाखो लोकांसमोर भाषण करताना आदित्यनाथ म्हणले की, हा ऐतिहासिक क्षण आहे, कारण प्रभू रामचंद्र ५०० वर्षांनंतर दिवाळीसाठी अयोध्येत आले आहेत. हा प्रारंभ आहे, २०४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा शतकोत्सव होईल तेव्हा अयोध्येप्रमाणेच काशी आणि मथुराही लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळून निघेल, असे योगी म्हणाले.

योगी आदित्यनाथ यांनी काशी आणि मथुरेचा उल्लेख केला त्याला विशेष महत्त्व आहे, कारण ही दोन्ही ठिकाणे कायदेशीर कचाट्यात आहेत. मथुरामध्ये कृष्णजन्मभूमी आणि शाही इदगाह दर्गा वाद आहे तर काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानव्यापी मशीद असा वाद आहे. अद्याप बरीच मजल मारावयाची आहे, हा प्रारंभ आहे, अयोध्या हे सनातन धर्माचे सुरुवातीचे ठिकाण आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भीषण अपघात; साखरझोपेत असताना २ चिमुकल्यांना अज्ञात वाहनाने चिरडले, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

भारत आणि रशियाला आम्ही गमावले! ट्रम्प यांना उशिरा सुचले शहाणपण