राष्ट्रीय

किरेन रिजिजू यांची कायदेमंत्री पदावरुन उचलबांगडी; 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

किरेन रिजिजू यांच्या जागी कायदेमंत्री पदावर आता भारतीय जनता पक्षाचे नेते अर्जून मेघपाल यांची नेमणूक करण्यात आली आहे.

नवशक्ती Web Desk

मोदी सरकारने आपल्या मंत्रीमंडळात बदल केला आहे. मोदी सरकारने किरेन रिजिजू यांना केंद्रीय कायदेमंत्री पदावरून हटवले आहे. किरेन रिजिजू यांच्या जागी कायदेमंत्री पदावर आता भारतीय जनता पक्षाचे नेते अर्जून मेघपाल यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर किरेन रिजिजू यांना पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाचा पदभार सोपवला आहे.

किरेन रिजिजू यांची 2021 मध्ये कायदेमंत्री पदावर नेमणूक करण्यात आली होती. भाजप नेते रविशंकर प्रसाद यांच्या जागेवर रिजिजू यांची नियुक्ती करण्यात आली होती. किरेन रिजिजू हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहीले आहेत. त्यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या कोलॅजियम सिस्टीमवर केलेले वक्तव खुप चर्चेत राहीले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायायल यांच्यात तणाव निर्माण झाला होता. त्यांचे हेच विधान त्यांना भोवले असून त्यामुळे त्यांची केंद्रीय कायदेमंत्री पदावरुन उचलबांगडी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

काय होते रिजिजू यांनी केलेले वक्तव्य?

सर्वोच्च न्यायालयाच्या कोलॅजियम सिस्टीमवर बोलताना किरेन रिजिजू म्हणाले होते की, "सर्वोच्च न्यायालयात असलेली कोलॅजियम पद्धत एलियन सारखी आहे. तुम्ही सरकारकडे फाईल प्रलंबित आहे, असे म्हणू नका. सरकारकडे फाईल पाठवू नका. तुम्ही स्व:ता स्व:ताची नेमणूक करा. भारतीय जनतेने तसेच संविधानाने न्यायाधीशांना अधिकार दिले आहेत. पण जर न्यायधीशांनीच निर्णय घ्यायचे असतील, तर लोकांचा न्यायाधीशांनी घेतलेल्या निर्णयाला पाठींबा असेल, ही अपेक्षा कशी केली जाऊ शकते." पुढे बोलताना रिजिजू म्हणाले की, "कोलॅजियम पद्धत अस्तित्वात असे पर्यंत सरकारकडून त्या पद्धतीचा आदरच केला जाणार आहे. मात्र, कोलॅजियम पद्धतीनुसार शिफासर झाल्याने त्या नावाला केंद्रसरकारने मान्यता द्यावी, अशी आशा तुम्हाला असेल तर सरकारची भूमिका काय उरेल?", असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर