लेह : लडाखमधील गलवान खोऱ्यातील चारबाग भागात लष्कराच्या वाहनावर एक मोठी दरड कोसळली. त्यामुळे वाहनाचे प्रचंड नुकसान होऊन वाहनातील दोन अधिकारी शहीद झाले, तर तीन अधिकारी गंभीर जखमी झाले. जखमींना विमानाने रूग्णालयात हलवण्यात आले.
लेफ्टनंट कर्नल मनकोटिया आणि दलजीत सिंग अशी शहीद जवानांची नावे आहेत, तर जखमींमध्ये २ मेजर आणि १ कॅप्टन दर्जाचे अधिकारी आहेत. सैनिकांचा ताफा दुर्बुक ते चोंगटास येथे प्रशिक्षण दौऱ्यावर होता. बुधवारी सकाळी ११:३०च्या सुमारास दुर्बुकहून चोंगताशला जाणारे लष्करी वाहन भूस्खलनात अडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये १४ सिंध हॉर्सचे लेफ्टनंट कर्नल मनकोटिया आणि दलजीत सिंग हे दोघे शहीद झाले. तर मेजर मयंक शुभम (१४ सिंध हॉर्स), मेजर अमित दीक्षित आणि कॅप्टन गौरव (६० आर्म्ड) जखमी झाले आहेत.