मुंबई/नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडरचे नवे दर शनिवारपासून लागू करण्यात आले असून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात सहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. फेब्रुवारीत दिल्लीत १७९७ रुपयांना मिळणारा १९ किलो एलपीजी सिलिंडर आता १८०३ रुपयांना मिळेल. मुंबईत मात्र एलपीजी सिलिंडरची किंमत आता १७५५.५० रुपये झाली आहे. १ ऑगस्ट २०२४ पासून घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच १४ किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.