राष्ट्रीय

ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरचे खराब हवामानामुळे इमर्जन्सी लँडिंग

संभाव्य धोका टाळण्यासाठी पायलटने सेवोक एअरबेसवर हेलिकॉप्टर उतरवल्याने अनर्थ टळला

प्रतिनिधी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरचे खराब हवामानामुळे मंगळवारी सिलिगुडीजवळ सेवोक या एअरबेसवर तातडीने लँडिंग करण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

जलपैगुडी येथील निवडणूक रॅलीला संबोधित केल्यानंतर ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरने बैकुंठपूरच्या जंगलावरुन जात होत्या. त्याचवेळी पाऊस आणि खराब हवामानाचा सामना त्यांना करावा लागला. संभाव्य धोका टाळण्यासाठी पायलटने सेवोक एअरबेसवर हेलिकॉप्टर उतरवल्याने अनर्थ टळला.

या घटनेनंतर ममता बॅनर्जी या बागडोगरा विमातळापर्यंत रस्त्याने गेल्या. तिथून त्या विमानाने कोलकाताला रवाना झाल्या,

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

कॅमेरुन ग्रीनवर लागली २५.२० कोटी रुपयांची बोली; पण मिळणार 'इतकेच' कोटी

महिला डॉक्टरचा हिजाब ओढला; नितीश कुमारांवर टीकेची झोड, "तुमची तब्येत ठीक नसेल तर...

लाइक, कमेंट अन् व्हायरल! Insta रिल्समुळे २० वर्षांच्या तरुणाला थेट IPL लिलावात एंट्री? कोण आहे इझाझ सावरिया?

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय? २०१२ पासून आजपर्यंत काय घडलं?