राष्ट्रीय

मोहम्मद जुबेर कोर्टाने जामीन नाकारला; काय आहे कारण ?

वृत्तसंस्था

Alt न्यूजचे सहसंस्थापक आणि पत्रकार मोहम्मद जुबेर यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने जामीन नाकारला असून त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम १५३/२९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद जुबेरला आज न्यायालयात हजर करण्यात आले. ट्विटद्वारे हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मोहम्मद जुबेरचे ते वादग्रस्त ट्विट 2018 चे आहे असे सांगण्यात येत आहे.

मोहम्मद जुबेरला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या IFSC युनिटने अटक केली आहे. आयपीसीच्या कलम १५३/२९५अ अंतर्गत झुबेरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद जुबेरने एका विशिष्ट धार्मिक समुदायाविरुद्ध पोस्ट केलेली छायाचित्रे आणि शब्द अत्यंत प्रक्षोभक आहेत आणि लोकांमध्ये हेतुपूर्वक द्वेष पसरवण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो . यामुळे सार्वजनिक शांतता राखणे कठीण होऊ शकते.

यावेळी बोलताना Alt न्यूजचे सह-संस्थापक प्रतीक सिन्हा म्हणाले की, मोहम्मद जुबेरला 2020 मध्ये एका वेगळ्या प्रकरणाच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बोलावले होते. त्यांना या प्रकरणी उच्च न्यायालयाचे संरक्षण आहे. मात्र, आता त्याच्यावर आणखी एका प्रकरणात आरोप केले आले आहेत. परंतु मोहम्मद जुबेरला या प्रकरणी माहिती देण्यात आली नाही. ज्या कलमांतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे.

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण