File Photo ANI
राष्ट्रीय

Monsoon Update : अखेर मान्सून भारतातून पूर्णपणे परतला ; यंदा भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस

यंदा मान्सूनच्या परतीचा प्रवास ८ दिवस उशिराने सुरु झाला होता

नवशक्ती Web Desk

भारतीय हवामान विभागाने मान्सूच्या परतीविषयी महत्वाची अपडेट दिली आहे. हवामान विभागाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण-पश्चिमी मान्सून १५ ऑक्टोंबरऐवजी १९ ऑक्टोबर(गुरुवारी) पूर्णपणे परतला आहे. यंदा मान्सूनच्या परतीचा प्रवास ८ दिवस उशिराने सुरु झाला. यंदा २५ सप्टेंबर रोजी मान्सूचा परतीचा प्रवास सुरु झाला होता. मान्सून सर्वसाधारणपणे १ जूनपर्यंत केरळमध्ये धडकून आठ जुलैपर्यंत देश व्यापतो.

मान्सून उत्तर पश्चिम भारतामधून १७ सप्टेंबर रोजी मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु करतो. तर १५ ऑक्टोंबरपर्यंत तो पूर्णपणे परततो. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून १९ ऑक्टोबर रोजी(गुरुवार) संपूर्ण देशातून परत गेला. दक्षिण भारतात पूर्व-उत्तर हवा वाहण्यास सुरुवात होऊन या भागात दोन ते तीन दिवसात उत्तर पूर्व-पूर्व मान्सून पाऊस सुरु होऊ शकतो. सामान्यपणे, उत्तर-पूर्व मान्सूनचं सुरुवातीचं चरण कमकूवरत राहण्याची शक्यता आहे. भारतात अल निनोचा चांगला प्रभाव जाणवला. त्यामुळे चार महिन्यात ८६८.६ मिमी पाऊस पडतो. मात्र, यंदा ८२० मिमी पावसाची नोंद झाली.

यंदाचं वर्ष वगळता मागील सलग चार वर्ष भारतात मान्सून चांगला राहिला आहे. काही वर्ष सामान्यपेक्षा चांगला पाऊस पडला आहे. एलपीएच्या ९६ टक्के ते १०४ टक्क्यांपर्यंत पडलेला पाऊस सामान्य समजला जातो. दक्षिण अमेरिकेजवळ प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान वाढल्यास त्याला अल निनो प्रभाव म्हटलं जातं. या कारणामुळे यंदा भारतात मान्सून कमकुवत आणि वातावरण शुष्क राहिलं.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप